बंद

पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 25/06/2021

औरंगाबाद, दिनांक 27 (जिमाका) : औरंगाबाद, दिनांक 27 (जिमाका) : उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई 2 दिवस औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे रविवार, 27 रोजी सायकांळी 05.00 वा.औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन (स्थळ:जिल्हा क्रीडा संकुल, चिकलठाणा) औरंगाबाद येथे मुक्काम.सोमवार, 28 रोजी सकाळी 9.45 वा महानगरपालिका संचालित प्रगती पेट्रोलपंपाचे उदघाटन (स्थळ: बायजीपुरा).सकाळी 10 वा. सरदार वल्लभाई पटेल यांच्य पुतळयाचे अनावरण. (स्थळ: शहागंज चमन) सकाळी 10.30 वा. जिल्हा विकास निधीतून औरंगाबाद पोलीस दलास उपलब्ध करुन दिलेल्या दुचाकी वाहनांचे पोलीस सेवेत दाखल करावयाच्या कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: पोलीस आयुक्त, कार्यालय) सकाळी 11.30 वा.जिल्हा परिषद विविध विकास कामांचा आढावा. (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 12.30 वा महानगरपालिका विविध विकास कामांचा आढावा. (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय) रात्री 8.20 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.