पश्चिममध्ये सर्वाधिक मतदार,तर पूर्वमध्ये सर्वात कमी !
प्रकाशन दिनांक : 20/04/2019
औरंगाबाद, दिनांक १९ (जिमाका) – औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदान निर्भय, नि:पक्ष आणि पारदर्शक वातावरणात व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येते. यातून मतदारांमध्ये जागृती होऊन नवमतदारांची भर पडते. या निवडणुकीत लोकसभा मतदार संघात एकूण 18 लक्ष 86 हजार 294 मतदार आहेत. त्यात सर्वाधिक औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघामध्ये तीन लक्ष 31 हजार 176 मतदार आहेत. तर सर्वात कमी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघात तीन लक्ष सहा हजार 83 मतदार आहेत.
सर्वाधिक मतदार औरंगाबाद पश्चिममध्ये आहेत. त्यात एक लक्ष 76 हजार 516 पुरूष, एक लक्ष 54 हजार 507 महिला, 13 तृतीय पंथी, 140 सर्विस मतदार मतदारांचा समावेश आहे. तर पूर्वमध्ये पुरूष एक लक्ष 61 हजार 215, महिला एक लक्ष 44 हजार 813, एक तृतीय पंथी आणि 54 सर्विस मतदारांचा समावेश आहे.
औरंगाबाद पश्चिमनंतर औरंगाबाद मध्यमध्ये एकूण तीन लक्ष 19 हजार 745 मतदार आहेत. यामध्ये एक लक्ष 65 हजार 153 पुरूष, एक लक्ष 54 हजार 494 स्त्री, एक तृतीय पंथी, सर्विस 97 या मतदारांचा समावेश आहे. त्याचप्रकारे गंगापूर विधानसभा मतदार संघामध्ये एक लक्ष 63 हजार 523 पुरूष, एक लक्ष 45 हजार 490, तृतीय पंथी नऊ, सर्विस मतदार 266 असे एकूण तीन लक्ष नऊ हजार 288 मतदार आहेत. कन्नड विधानसभा मतदार संघामध्ये एक लक्ष 64 हजार 841 पुरूष, एक लक्ष 46 हजार 932 महिला, 506 सर्विस मतदार मिळून तीन लक्ष 12 हजार 279 मतदार आहेत. तर वैजापूर विधानसभा मतदार संघात तीन लक्ष सात हजार 723 मतदार आहेत. यामध्ये एक लक्ष 61 हजार 349 पुरूष , एक लक्ष 46 हजार 18 महिला, एक तृतीय पंथी आणि 355 सर्विस मतदार अशा मतदारांचा समावेश आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात नऊ लक्ष 92 हजार 597 पुरूष, आठ लक्ष 92 हजार 254 स्त्री, तृतीय पंथी 25, सर्विस मतदार एक हजार 418 असे एकूण 18 लक्ष 86 हजार 294 मतदार आहेत. सर्व मतदार येत्या 23 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
*****