परीक्षेचे साहित्य घेऊन जाण्यासाठी मुख्याध्यापकांना आवाहन
प्रकाशन दिनांक : 12/02/2019
औरंगाबाद, दि. ५ (जिमाका) – सर्व मान्यताप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांना या प्रकटनाव्दारे सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च-२०१९ परीक्षेचे प्रात्यक्षिक साहित्य, ओएमआर व श्रेणी तक्ते (ग्रेडलिस्ट) नेहमीच्या जिल्हा वितरण केंद्रावर शुक्रवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ ते दु. ५ या वेळेत वाटप करण्यात येणार आहे. तेव्हा सदर तारखेस आपल्या शाळेचा प्रतिनिधीस लेखी पत्रासह पाठवून प्रात्यक्षिक साहित्य व श्रेणी तक्ते (ग्रेडलिस्ट) हस्तगत करून घ्यावे असे सर्व मान्यताप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांना आवाहन करण्यात येत आहे, असे विभागीय सचिव, विभागीय मंडळ, औरंगाबाद यांनी कळविले आहे.