बंद

पदवीधर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करा- डॉ. अनंत गव्हाणे पदवीधर निवडणूक : क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

प्रकाशन दिनांक : 13/10/2020

औरंगाबाद,दि.12 (जिमाका):-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडा. मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करा, असे अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 डॉ. गव्हाणे यांनी मतदान पूर्व, मतदानाच्या दिवशी, मतदानानंतर करावयाची कामे, क्षेत्रीय अधिकारी  यांचे अहवाल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मतदान केंद्रे, मतदार जागृती, मार्ग  निश्चिती बाबत, कायदा व सुव्यवस्था, साहित्य स्वीकृती व तपासणी आदी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा मतदारांना उपलब्ध करुन देण्यात येत असल्याबाबत खात्री करावी. मतदान केंद्र, मतदान केंद्रांची व्याप्ती आदींबाबत माहिती करुन घ्यावी. कोविड-19 च्या अनुषंगाने मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात यावी. स्वीप कार्यक्रमातंर्गत मतदारांत जागृती निर्माण करणे. मतदान केंद्रांबाबत मतदारांना माहिती देणे. झोनमधील मतदान केद्रांना भेटी देणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यसाठी पोलिस, सुक्ष्म निरीक्षक यांच्याशी समन्वय ठेवावा. साहित्य स्वीकृती व तपासणी, मतदानाच्या आदल्या दिवशी करावयाची कामे, मतदान प्रक्रिये दरम्यान कर्तव्ये, क्षेत्रीय दंडाधिकारी म्हणून कर्तव्य बजावणे, मतदान संपल्यानंतरची कर्तव्ये पार पाडणे, अहवाल निश्चित वेळेत सादर करण्याबाबत श्री. गव्हाणे यांनी सविस्तर मार्गदर्शन अधिकाऱ्यांना केले . त्याचबरोबर त्यांच्या शंकांचे निरसनही केले. आभार नायब तहसीलदार सिद्धार्थ धनजकर  यांनी मानले.