बंद

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विभागीय स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना

प्रकाशन दिनांक : 05/11/2020

औरंगाबाद, दि. 4 (विमाका) – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या तक्रारीची दखल घेण्याकरीता विभागीय स्तरावर मुख्यालयाच्या ठिकाणी 24X7 तत्त्वावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द झाल्यापासून म्हणजे दिनांक 05 नोव्हेंबर 2020 पासून ते निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत विभागीय स्तरावर मुख्यालयाच्या ठिकाणी 24X7 तत्वावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून 0240-2343164 या दुरध्वनी क्रमांकावर व 5graduateabd@gmail.com या ई-मेल आयडीवर मतदारांच्या तक्रारीची दखल घेतली जाणार आहे, असे विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.