पदवीधर मतदानाच्या दिवशी 1 डिसेंबर रोजी आठवडी बाजार भरवण्यास मनाई
प्रकाशन दिनांक : 30/11/2020
औरंगाबाद, दिनांक 27 (जिमाका):- पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 साठी दिनांक 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या दिनांकाच्या दिवशी औरंगाबाद जिल्हयातील तालुक्यात, गावात भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे मतदान कामामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने सुनील चव्हाण, जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद यांनी मार्केट ॲण्ड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 7 (अ) अन्वये कलम 3,4,5 च्या तरतूदीनूसार औरंगाबाद जिल्हयातील स्थळ सिमेच्या हददीत खालील नमूद गावातील 1 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी असणाऱ्या आठवडे बाजार भरवण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.
या आदेशानूसार सिल्लोडमधील पालोद, कन्नडचे पिशोर, हतनूर, फुलंब्री, पैठणमधील विहामांडवा, आडूळ, ढोरकीन, लोहगाव, गंगापूरमधील सिदधनाथ वाडगाव, कायगाव, वैजापूरमधील मनूर, धोंदलगाव, सोयगाव या ठिकाणी आठवडी बाजार भरवण्यास उपरोक्त आदेशाने मनाई करण्यात आली आहे