बंद

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आजपासून • सेवायोजन नोंदणी करण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 22/09/2020

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) :जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केंद्राचे सहायक आयुक्त एन.एन. सूर्यवंशी यांनी दिली.

या कार्यालयाकडील औरंगाबाद जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. यामधील मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्स, इतर माध्यमाव्दारे ऑनलाईन पध्दतीने (skype,whatsapp etc.) घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून अनेक औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद होते. शासनाने काही अटी व शर्तीच्या अधीन राहून कंपन्या औद्योगिक आस्थापना व्यवसाय उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यासाठी नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांकरिता ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे  www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात आलेली आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी शैक्षणिक पात्रतेप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे. अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्स   (skype,whatsapp etc.) व्दारे घेण्यात येणार आहेत.

या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी वेबपोर्टलला लॉग इन करावे. नोकरीइच्छूक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा ॲड्रॉईड मोबाईल धारकांनी प्लेस्टोअरमधून  mahaswayam ॲप मोफत डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगइन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे.

भरती इच्छूक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhayay Job fair ऑप्शन वर Click करुन Aurangabad Online Job Fair-2 (2020-21) यावर त्यांचेकडील रिक्तपदे अधिसूचित करावी.

मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिध्दी या विभागाच्या वेबपोर्टलवर विनामुल्य करावी . याबाबत काही अडचण असल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 0240-2334859 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छूक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. सूर्यवंशी यांनी केले.