बंद

नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना दिवाळी बोनस रक्कम वाटप

प्रकाशन दिनांक : 28/10/2020

औरंगाबाद, दि.28 (जिमाका) :-औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, जालना, औरंगाबाद या मंडळाने मंडळातील नोंदणीकृत कार्यरत 564 सुरक्षा रक्षकांना सन 2019-20 या कालावधीतील दिवाळी बोनस म्हणून रक्कम रुपये 83 लक्ष 47 हजार 796 इतकी रक्कम बँक खात्याद्वारे वाटप केलेली आहे, असे कामगार उपआयुक्त तथा मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र ब. पोळ व सरकारी कामगार अधिकारी तथा मंडळाचे सचिव रोहन घ. रुमाले यांनी प्रसिध्दी पत्राव्दारे कळविले आहे.