बंद

नोंदणीकृत माथाडी कामगारांना प्रत्येकी पाच हजारांचे अर्थसाहाय्य

प्रकाशन दिनांक : 22/08/2020

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :- औरंगाबाद माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ औरंगाबाद या मंडळाने कोवीड-19 च्या कालावधीत शासनाच्या आदेशान्वये मंडळातील नोंदीत कार्यरत माथाडी कामगारांना रक्कम रूपये पाच हजार पर्यंत आर्थिक सहाय्य देणे बाबत मंडळास आदेशीत केलेले होते.त्यानुसार कामगार उपआयुक्त तथा अध्यक्ष शैलेंद्र पोळ सरकारी कामगार अधिकारी तथा साचिव रोहन रूमाले औरंगाबाद माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, औरंगाबाद यांच्या आदेशाने मंडळाच्या प्रशासकीय खात्यामधून सुमारे एक हजार 585 नोंदणीकृत कार्यरत माथाडी कामगारांना प्रत्येकी रूपये पाच हजार या प्रमाणे एकूण रक्कम रूपये 79 लाख 25 हजार (एकोणएैंशी लाख पचंवीस हजार मात्र) बँक खात्या व्दारे रक्कम वाटप करण्यात आली असल्याचे सरकारी कामगार अधिकारी तथा सचिव यांनी प्रसिध्दी पत्र कान्वये कळविले आहे.