बंद

निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना आवाहन

प्रकाशन दिनांक : 02/11/2020

औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) : जिल्हा परिषद औरंगाबाद कार्यालयामार्फत निवृत्ती, कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी 1 नोव्हेंबर 2020 रोजी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र 30 डिसेंबर 2020 अखेर सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत निवृत्तीवेतन धारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत आहेत त्या बँक व्यवस्थापक यांच्या स्वाक्षरीसह बँकेमार्फत सादर करावी. तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्त नसल्याचे, 60 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी पुनर्विवाह न केल्याचे प्रमाणपत्र हयातीच्या प्रमाणपत्रासोबत सादर करावे. ज्या निवृत्ती वेतन धारकांचे सदरील प्रमाणपत्र मुदतीत प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे जानेवारी 2021 चे निवृत्तीवेतन बँकेत जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद, औरंगाबाद यांनी कळविले आहे.