बंद

निवृत्ती वेतन धारकांना आवाहन

प्रकाशन दिनांक : 08/10/2020

औरंगाबाद, दि.07 (जिमाका):- राज्य शासनाच्या वित्त विभागाने  राज्यशासकीय निवृत्तीवेतन  धारक/ कुटुंब निवृत्तीवेतन  धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि. 31 डिसेंबर पर्यंत  मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

तसेच ज्यांचे वय दि. 1 ऑक्टोबर रोजी 80  वर्षे पुर्ण होत आहे. अशा निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दि. 1 ऑक्टोबर 2020  ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत हयातीचा दाखला सादर करता येईल.

तसेच 1 ऑक्टोबर 2020 अथवा त्यानंतर हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निवृत्तीवेतन धारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी संबंधित बॅकामध्ये दि. 31 डिसेबर 2020 पर्यत जाऊन कोषागार  कार्याल्याच्या यादीवर स्वाक्षरी करावी अथवा JEEVAN PRAMAN प्रणालीव्दारे ONLINE प्रमाणपत्र सुध्दा सादर करता येईल, असे आवाहन श्री. आर.बी.लिंगनवाड, वरिष्ठ कोषागार अधिकारी औरंगाबाद यांनी केले आहे.