निवडणूक निर्भय व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी चोख कायदा व सुव्यवस्था राखावी – अब्दुल समद
प्रकाशन दिनांक : 08/04/2019
औरंगाबाद, दि.०६, (जि.मा.का.) :- लोकसभा निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी जो कायदा व सुव्यवस्था राखावी तसेच नियोजित मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील सोयी सुविधा बाबत नियमित आढावा घेण्याचे निर्देश १८-जालना लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक अब्दुल समद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित 18-जालना लोकसभा मतदारसंघाच्या नोडल अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आढावा बैठकीत अब्दुल समद बोलत होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी, औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निलेश श्रींगी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड फुलंब्री पैठण या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश १८-जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये होतो. या तीन विधानसभा मतदारसंघासह औरंगाबाद जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीचा अब्दुल समद यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी उदय चौधरी यांनी औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान पूर्वतयारीची माहीती सादरीकरणाद्वारे अब्दुल समद यांना दिली औरंगाबाद जिल्ह्यातील पूर्वतयारी पाहून अब्दुल समद यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची प्रशंसा केली.
निवडणूक निरीक्षक अब्दुल समद म्हणाले की मतदान काळात सर्व यंत्रणांनी आपली कर्तव्य चोखपणे बजावीत, पोलिंग साहित्य देताना प्रशिक्षणावर भर द्यावा तसेच मतदान केंद्रावर नियमितपणे जाऊन स्थितींचा देखील आढावा घ्यावा असेही त्यांनी बैठकीत सांगितले तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील स्वीपच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेवटच्या मतदारांपर्यंत करण्यात आलेल्या मतदान जनजागृती बाबतही त्यांनी कौतुक केले
****
