बंद

निवडणूक निरीक्षक ब्राज मोहन कुमार यांचे आज आगमन

प्रकाशन दिनांक : 05/04/2019

औरंगाबाद, दि.०२ (जि.मा.का.) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ अंतर्गत १९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून श्री.ब्राज मोहन कुमार (आय.ए.एस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक यांचे दिनांक ३ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी औरंगाबाद शहरात आगमन होणार आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८२७५७८७८५० हा आरक्षित करण्यात आला आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीलेश श्रींगी यांनी कळविले आहे.

*****