बंद

निवडणूक खर्च निरीक्षक श्री. चंदनानी यांचे आगमन

प्रकाशन दिनांक : 01/04/2019

औरंगाबाद, दिनांक २८ (जि.मा.का.) – भारत निवडणूक आयोगाने दिनांक 10 मार्च 2019 ला प्रसिद्धी पत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०१९ चा कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यात ४ टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार असून आज दिनांक २८ मार्च २०१९ रोजी नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यास सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्ज स्विकारण्याची अंतीम दिनांक ४ एप्रिल २०१९ आहे. त्या अनुषंगाने श्री. चंदनानी, निवडणूक खर्च निरिक्षक यांचे औरंगाबाद येथे दिनांक २७ मार्च २०१९ रोजी आगमन झाले असून त्यांचा संपर्क क्र. ९४२०४२०४८८ हा आहे, असे निलेश श्रींगी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी , औरंगाबाद यांनी कळविले आहे.

******