निर्बंधात शिथिलता असली तरी नियमांचे काटेकोर पालन करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 21/06/2021
औरंगाबाद जिल्ह्यासाठी निर्बंधातील शिथिलतेच्या मर्यादेबाबत अंशत: सुधारणा आदेश निर्गमित
- पर्यटन स्थळाबाबत 15 जुन रोजीचे आदेश कायम
- धार्मिक स्थळे पुर्णपणे बंद
औरंगाबाद (जिमाका)दि 19- औरंगाबाद जिल्हयातील कोविड-19 विषयक बाधित परिस्थिती लक्षात घेऊन व प्राप्त वैद्यकीय अहवालाच्या आधारे जिल्हयातील रुग्णांची टक्केवारी 2.94 टक्के (Positivity)असून व्यापलेल्या ऑक्सीजन बेडची टक्केवारी 6.81 टक्के असल्याने औरंगाबाद जिल्हयाचे वर्गवारी नुसार स्थान Level-1 मध्ये सध्या आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद व पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर व आयुक्त महानगरपालिका ,औंरगाबाद यांच्या संयुक्त स्वाक्षरीने संपूर्ण औरंगाबाद जिल्हा क्षेत्राकरिता दि. 21 जुन रोजीचे सकाळी 07.00 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत (5 जुन आणि 6 जुन मध्ये सुधारणा करुन) निर्बंध शिथिल (Restriction Relaxation ) करुन सुधारित आदेश लागू करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील संक्रमण वाढत राहिले तर निर्बंध अधिक कडक करण्यात येणार असून जनतेच्या मुक्त जीवन जगण्यावर मर्यादा येणार असल्याने नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
अ.क्र. |
बाब / तपशील |
निर्बंधांबाबत सुचना |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
1 |
सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना |
संपूर्ण आठवडाभर परंतु अंशत: निर्बधात शिथीलतासह नियमित चालू राहिल. |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
2 |
अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकाने |
नियमितपणे पूर्ण वेळ: दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
3 |
अत्यावश्यक वस्तू व सेवा व्यतीरिक्त इतर सर्व व्यवसाय व दुकाने |
नियमितपणे पूर्ण वेळ: दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
4 |
मॉल्स/ नाट्यगृहे/ चित्रपटगृहे |
50 % आसन क्षमतेनुसार |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
5 |
रेस्टॉरंट/ शिवभोजन थाळी, खानावळी हॉटेल्स |
नियमितपणे दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
6 |
सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे/ Morning Walk व सायकलिंग |
नियमितपणे पूर्ण वेळ: दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
7 |
खाजगी आस्थापना |
नियमितपणे पूर्ण वेळ: दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
8 |
कार्यालयीन उपस्थिती शासकीय/खाजगी / निमशासकिय |
अधिकारी व कर्मचारी यांच्या 100 % उपस्थितीने
|
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
9 |
क्रीडा |
नियमितपणे पूर्ण वेळ: दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
10 |
चित्रीकरण (Shooting) |
नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
11 |
स्नेहसंमेलने (Gathering), सामाजिक, सांस्कृतिक, करमणूकीचे कार्यक्रम |
50 % सभागृह अथवा मैदान आसन क्षमतेनुसार |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
12 |
धार्मिक स्थळे |
पुर्ण पणे बंद राहतील |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
13 |
विवाह संमारंभ |
सभागृहाच्या आसन क्षमतेच्या 50% लोकांच्या उपस्थितीत |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
14 |
अंत्यविधी |
100 लोकांच्या उपस्थितीत |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
15 |
सभा, निवडणुका, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांचे आमसभा |
सभागृह / हॉलच्या / मैदान आसन क्षमतेच्या 50% |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
16 |
बांधकाम |
नियमितपणे दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
17 |
कृषी संबंधीत बाबी |
नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
18 |
ई-कॉमर्स वस्तु व सेवा |
नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
19 |
जीम/वेलनेस सेंटर/स्पा/ ब्युटी पार्लर/सलुन |
दररोज क्षमतेच्या 50% पूर्व- परवानगीसह (Appointment) |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
20 |
जलतरण तलाव (Swimming Pool) |
क्रीडा-संकुल (Sports Complex), स्वंतत्र जलतरण तलाव, जीम , हॉटेल्स यांना संलग्नीत सर्व जलतरण तलाव पूर्णपणे बंद राहतील. |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
21 |
सार्वजनिक बस वाहतूक |
पूर्ण आसन क्षमतेने परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई आहे. |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
22 |
कार्गो वाहतूक सर्व्हिसेस (जास्तीत जास्त तीन व्यक्तीसह) |
नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
23 |
अंतर जिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार, टॅक्सी,बस) व ट्रेन |
नियमितपणेमधील भागातून अथवा 5 जर प्रवासी लेवल अशा जिल्हामार्गे प्रवास करीत असल्यासप्रवशांना ई पास आवश्यक राहिल. |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
24 |
उत्पादन क्षेत्र (Export Oriented Units) (निर्यात प्रधान उद्योग) |
नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
25 |
उत्पादन क्षेत्र (1. अत्यावश्यक वस्तू व त्याकरीता लागणारा कच्च माल उत्पादक पॅकेजींग व संपूर्ण साखळीतील सेवा 2. निंरतर प्रक्रिया असलेले उद्योग 3.संरक्षण संबंधित उद्योग 4. डेटा सेंटर / क्लॉवुड सर्व्हिस प्रावायडर/ माहिती तंत्रज्ञान सेवा संबंधी,गुंतागुंतीचे पायाभूत सेवा व उद्योग ) |
नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
26 |
उत्पादन क्षेत्र (अत्यावश्यक सेवा व निंरतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रधान उद्योग व शासनाच्या आदेश दि. 04 जून 2021 मधील मुद्दा क्र. 23 व 24 मधील बाबी वगळून इतर उत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा) |
नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे. 1) मास्क वापरणे 2) 2 गज दुरी (6 फुट अंतर) 3) सॅनीटायझर 4)आवश्यकतेनूसार फेसशिल्ड वापरणे आनिवार्य |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
- सर्व उदयोग,व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचा-यांना निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहिल.(वैधता 15 दिवसांकरिता) निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवालाशिवाय दुकान/व्यवसाय सुरु करता येणार नाही.
विशेष सूचना: ज्या मुद्यांमध्ये आसनक्षमतेचा उल्लेख आहे अशा सर्व आस्थापनांनी त्यांची एकूण आसन क्षमता घोषित करणारा फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे |
- या नियमांचे उल्लंघन केल्यास कोराना महामारीची आपत्ती जोपर्यंत अस्तीत्वात आहे तो पर्यंत संबंधित दुकान/आस्थापनावर दंडात्मक कारवाई/बंद ठेवण्यात (Seal) येईल, तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाप्रमाणे दंड आकारण्यात येईल.
- उक्त निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त महानगरपालिका, नगरपालिका / नगर पंचायत मुख्याधिकारी यांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी Incident Commander जिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहिल.
- प्रस्तुत आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करू शकतील
- सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 21 जून 2021 चे सकाळी 07.00 वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहिल.
सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमजबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहिल असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.