बंद

नियमांचे पालन करण्याच्या अटीवर बाबा पेट्रोल पंप सुरु – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 23/11/2021

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) :कोविड-19 अनुषंगाने आवश्यक असलेल्या शिष्टाचाराचे पालन करण्याच्या अटीवर आणि ग्राहकांचे कोविड लसीकरण झाल्याच्या खात्रीनंतर बाबा पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल मिळणार आहे.

कोविड नियमांचे पालन न केल्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बाबा पेट्रोल पंपवर कारवाई (ता.21)  केली होती. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने आणि बाबा पेट्रोल पंप मालक यांनी कोविड-19 अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी बाबा पेट्रोल पंप आज खुला करण्यास परवानगी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे.  नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी पेट्रोल पंप चालकांसह सर्व नागरिकांना केले.

औरंगाबाद शहर कोरोनामुक्त होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येताना लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे,  असे आवाहन बाबा पेट्रोल पंपचे मालक ब्रुझिन प्रिंटर यांनी केले. सुरूवातीला जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार पंपचे सील काढले. यावेळी पंपचे मालक प्रिंटर यांनी प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत कोविड 19 अनुषंगाने पंपावर करावयाची प्रक्रिया पार पाडणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी चव्हाण यांना यावेळी दिली.

नियमांचे पालन करण्याच्या अटीवर बाबा पेट्रोल पंप सुरु