बंद

नाफेडमार्फत मुग, उडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 24/09/2020

औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) : केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम 2020-21 मधे नाफेड मार्फत मुग, उडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.

            औरंगाबाद जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन मार्फत जाधववाडी औरंगाबाद, गंगापुर, वैजापुर व खुलताबाद,कन्नड, सोयगाव, येथे तालुका खरेदी विक्री संघामार्फत ऑनलाईन नोंदणी सुरु असुन त्याकरिता शेतकऱ्यांनी आधारकार्ड, झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स व 7/12 उतारा पिकपेरासह आणने आवश्यक आहे. तरी शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी श्री. बी. आर. पाटील यांनी केले आहे.

हंगाम 2020-21 मध्ये केंदशासनाचे  आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत मुग, उडीद खरेदीसाठी  15 सप्टेंबरपासून  मुग प्रति क्विंटल 7196 रुपये तर उडीद  प्रति क्विंटल 6000 रुपये हमीभावाप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे.