बंद

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आज प्रशिक्षण

प्रकाशन दिनांक : 12/02/2019

औरंगाबाद, दि. 5 (जिमाका) – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील 406 गावांची निवड झालेली आहे. पहिल्या टप्प्यात 77 दुसऱ्या टप्प्यात 194 व तिसऱ्या टप्प्यात 135 गावे याप्रमाणे प्रकल्प अंमलबजावणी होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 77 गावांमधील 59 ग्राम कृषी संजीवनी समितीचे प्रशिक्षण यशदाच्या प्रवीण प्रशिक्षकांमार्फत टप्प्या–टप्प्यात घेण्यात आले होते. या प्रक्रियेमध्ये खूप वेळ आणि मनुष्यबळ खर्च होत  होते. नुकताच प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, दुसऱ्या टप्प्यात स्थापित झालेल्या ग्राम कृषी संजीवनी समितींना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. म्हणून दुसऱ्या टप्प्यातील ग्राम कृषी संजीवनी समितीचे प्रशिक्षण एकाच वेळी दूरस्थ प्रशिक्षणाव्दारे दिनांक 6 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात येणार आहे. तरी सदरील प्रशिक्षणास सर्व ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यांनी उपस्थित राहणेबाबत मा. जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी आवाहन केले आहे.

दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील 194 गावांची निवड करण्यात आली आहे. 194 गावे 135 ग्रामपंचायतमध्ये विभागली असून त्यापैकी 134 ग्राम कृषी संजीवनी समितींची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक ग्राम कृषी संजीवनी समितीमध्ये 13 कार्यकारी व 4 अकार्यकारी असे एकूण 17 सदस्य आहेत. दुसऱ्या टप्प्यात स्थापन झालेल्या 134 ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यांचे प्रशिक्षण दिनांक 6 फेब्रुवारी 2019 रोजी दूरस्थ प्रशिक्षण (live streaming) प्रकल्प व्यसस्थापन कक्ष मुंबई येथील गणमान्य अधिकारी व विशेषज्ञ यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे.

दूरस्थ प्रशिक्षण (live streaming) घेण्यासाठी इंटरनेट, कॉम्पुटर व लॅपटॉप एलसीडी प्रोजेक्टर, स्क्रीन किंवा टीव्ही, ओडिओ स्पीकर, युपीएस (UPS) इ. आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने दिनांक 2 फेब्रुवारी 2019 रोजी नियोजित प्रशिक्षण ठिकाणी NETWORK TEST करण्यात आली होती. त्यानुसार 74 प्रशिक्षण ठिकाणे निश्चित करण्यात आली असून सदरील प्रशिक्षण 74 ग्रामपंचायतींमध्ये आयोजित करण्यात आले आहे. 134 ग्राम कृषी संजीवनी समितीच्या एकूण 2278 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी 86 संपर्क अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सदरील प्रशिक्षणाची सुरूवात मा. मुख्यमंत्री महोदयांच्या संदेशाव्दारे सकाळी 10.30 वा. होईल. त्यानंतर मा. कृषी मंत्री महोदय ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यांना आवाहन करतील. प्रकल्प पार्श्वभूमी व उद्देश याबाबत विकासचंद्र रस्तोगी (प्रकल्प संचालक) मार्गदर्शन करतील. या प्रशिक्षणामध्ये ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यांना ग्राम कृषी संजीवनी समितीची रचना व जबाबदाऱ्या, सूक्ष्म नियोजन, पाण्याचा ताळेबंद व विकास आराखडा, प्रकल्पांतर्गत मृद व जलसंधारण कामे, शेतकरी व महिला गट आणि उत्पादक कंपन्यांना सहाय्य, इ-टेंडर व वित्तीय व्यस्थापन व हवामान अनुकूल तंत्रज्ञान व बिजोत्पादन याबाबत प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, मुंबई सविस्तर मार्गदर्शन करणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आज प्रशिक्षण