बंद

नाताळ निमित्त जनतेला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या सूचना

प्रकाशन दिनांक : 24/12/2020

औरंगाबाद, दिनांक 24 (जिमाका): फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसारऔरंगाबाद जिल्‍हयासाठी पोलिस आयुक्‍त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळुन दिनांक 25/12/2020 रोजी साजरा होणा-या नाताळ सणानिमित्‍त औरंगाबाद जिल्‍हयातील सर्व जनतेला काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत.

अ.क्र.

काय करावे

काय करु नये

 

01

1.     कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे अनुपालन करावे.

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने कोणत्‍याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्‍या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्‍लंघन करण्‍यात येऊ नये.

 

2.     

02

3.   नाताळ सण यावर्षी साध्‍या पध्‍दतीने साजरा करावा.

4.   

सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्‍त्‍यावर मोठया संख्‍येने एकत्र येऊ नये.

03

5.  चर्चमध्‍ये जास्‍तीत जास्‍त 50 लोकांच्‍या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे व त्‍या ठिकाणी Social Distancing राखले जाईल याची काळजी घ्‍यावी.

6.    

चर्चमध्‍ये प्रार्थनेच्‍या वेळी गर्दी करु नये.

04

7.  चर्चमध्‍ये प्रभु येशूंच्‍या जीवनावरील देखावे, ख्रिसमस टूी अगर काही वस्‍तू ठेवल्‍या जातात त्‍या ठिकाणी सोशल डिस्‍टन्‍सींग व स्‍वच्‍छतेचे नियम पाळावेत व चर्चमध्‍ये निर्जंतुकीकरणाची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.

 

8.    

चर्चच्‍या बाहेर व परीसरात दुकाने/स्‍टॉल लावण्‍यात येऊ नयेत.

 

05

9.   चर्चमध्‍ये प्रभु येशू ख्रिस्‍त यांचे स्‍तुतीगीत (Choir )गाण्‍यासाठी जास्‍तीत जास्‍त 10 गायकांचा समावेश करण्‍यात यावा व त्‍यावेळी वेगवेगळया माईकचा वापर करावा.

10.                  

गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्‍यात येऊ नये.

06

11.                 आयोजकांनी60 वर्षावरील नागरीकांसाठीव 10 वर्षाखालील बालकांसाठी ऑनलाईन प्रार्थनेची (Online Masses)सुविधा उपलब्‍ध करुन दयावी.

60 वर्षावरील नागरीकांनी व 10 वर्षाखालील बालकांनी शक्‍यतो घराबाहेर जाऊ नये.

07

12.                          ध्‍वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करण्‍यात यावे.

13. फटाक्‍याची आतषबाजी करण्‍यात येऊ नये.

08

14.                        31 डिसेंबर रोजी चर्चमध्‍ये आयोजित करण्‍यात येणारी प्रार्थना (Thanks Giving Mass) ही मध्‍यरात्री आयोजित न करता संध्‍याकाळी 7.00 वा.किंवा त्‍यापुर्वी घेण्‍याचे नियोजन करण्‍यात यावे.

चर्चमध्‍ये होणारी प्रार्थना ही मध्‍यरात्री आयोजित करण्‍यात येऊ नये.