बंद

नागरिकांनी मनाई आदेशाचे कटाक्षाने पालन करण्याचे – जिल्हाधिकारी यांचे आवहान

प्रकाशन दिनांक : 26/03/2021

औरंगाबाद, दि.26, (जिमाका) :- जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना या विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केलेला आहे.तसेच कोरोना विषाणूचा प्रसार औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गतीने पसरत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.त्यामुळे दिनांक 11 मार्च,2021  पासून ते दिनांक 04 एप्रिल,2021 या कालावधीमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे.तसेच दिनांक 16.मार्च 2021 च्या मा.जिल्हाधिकारी व मा.पोलीस आयुक्त,औरंगाबाद यांचे संयुक्त आदेशान्वये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्हयाच्या हद्दीपावेतो शुक्रवार दिनांक 19.मार्च2021 ते रविवार दिनांक 04.एप्रिल 2021 पर्यंत मनाई आदेश निर्गमित केलेले आहे.सदरील मनाई आदेश हे सायंकाळी 08.00 वाजेपासून ते सकाळी 05.00 वाजेपर्यंत लागू राहिल तसेच दिनांक 04.एप्रिल 2021 पर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी पुढील सेवा पुर्णवेळ सुरु राहतील यामध्ये वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र,मिडीया संदर्भातील सेवा,दूध विक्री व पुरवठा इ.,पेट्रोल पंप,गॅस एजन्सी इ., सर्व प्रकाराच्या वाहतूक सेवा (खाजगी व शासकीय), रिक्षासह इ.,बांधकामे, उद्योग व कारखाने, बँक व पोस्ट सेवा संदर्भात त्यांचे नियमानूसार सेवा सुरु ठेवण्यास मुभा राहिल.

तसेच वरील सेवा देणाऱ्या संबंधीत वाहनांनाच पेट्रोल पंपावरुन इंधन भरुन देणे बाबत सूचना सर्व पेट्रोल पंप चालकांना दिलेल्या आहे.परंतु तरीही सोमवार दिनांक 22.मार्च 2021 रोजी महावीर चौकातील एन.ए.प्रिंटर्स,सेव्हन हिल येथील जागृत पेट्रोल पंप व हर्सुल टि.पाँईट येथील एच.पी.कंपनीचा पेट्रोल पंपचालकानी मनाई आदेशाचे वेळेत अत्यावश्यक सेवा व्यतीरिक्तच्या लोकांना इंधन देत असल्याचे मा.जिल्हाधिकारी व मा.पोलीस आयुक्त यांचे निदर्शनास आल्यामुळे त्यांचे पेट्रोल पंप सील करण्यात आलेले आहे.मनाई आदेशाचे कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरीकांनी बाहेर पडू नये.मनाई आदेशाचे वेळेच्या व्यतिरिक्तच्या कालावधीमध्ये आवश्यक असल्यास बाहेर पडावे व सतत मास्कचा वापर करावा तसेच आवश्यक तेथे सॅनिटाईजरचा वापर करावा.दिनांक 04.एप्रिल 2021 पर्यंत रोज रात्री 08.00 ते सकाळी 05.00 पर्यंत उक्त सेवा चालू राहणार असल्याने इतर सर्व सामान्य नागरीकांना इंधन भरण्यासाठी बाहेर पडू नये कारण सदर कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच इंधन भरुन देण्यात येणार आहे.त्यामूळे सर्व सामान्य नागरिकांनी मनाई आदेशाचे व्यतिरिक्तच्या कालावधीमध्ये आवश्यकता असल्यास आपल्या वाहनांमध्ये आवश्यक तेवढे इंधन भरुन घ्यावे.तसेच गॅस डिलीव्हरी करणारे गॅस एजन्सीचे कर्मचारी व गॅस घेणाऱ्या ग्राहकांनी गॅस घेते/ देते वेळे मास्कचा व सॅनिटाईजरचा वापर करावा.

याव्दारे, सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की, कोरोनाचा वाढता संसर्ग थांबण्यिासाठी आपल्या घरामधून आवश्यकता असल्यास बाहेर पडावे व बाहेर गेल्यावर सतत मास्क व आवश्यक तेथे सॅनिटाईजरचा वापर करावा व मनाई आदेशाचे वेळेमध्ये घराबाहेर पडू नये, असे आवाहन मा.जिल्हाधिकारी श्री.सुनील चव्हाण यांनी केले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी,औरंगाबाद यांनी कळविले आहे.