बंद

नवरात्रोत्सवानिमित्त काय करावे करु नये याबाबत प्रशासनाचे

प्रकाशन दिनांक : 07/10/2021

औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) :  सार्वजनिक नवरात्रोत्‍सव 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर साजरा करण्‍यात येणार आहे. त्‍याअनुषंगाने शासनाने नवरात्रोत्‍सव 2021 साजरा करण्‍याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्‍या आहेत. त्‍यानुसार औरंगाबाद जिल्‍हयात कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक नवरात्रौत्‍सव साजरा करण्‍याबाबत शासनाच्‍या मार्गदर्शन सूचनानुसार औरंगाबाद जिल्‍हयातील सर्व जनतेला सार्वजनिक नवरात्रौत्‍सव 2021 साजरा करण्‍याबाबत काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

 

अ.क्र.

काय करावे

काय करु नये

1.

1.       कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे अनुपालन करावे.

कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने कोणत्‍याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्‍या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्‍लंघन करण्‍यात येवू नये.

 2.

2.    सार्वजनिक नवरात्रौत्‍सवासाठी मंडळांनी संबंधित स्‍थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक आहे.

नवरात्रौत्‍सव मंडळांनी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या पूर्वपरवानगी शिवाय देवीच्‍या मुर्तीची स्‍थापना करु नये.

 3.

3.      कोविड-19 मुळे उध्‍दवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्‍थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्‍वरुपाचे मंडप उभारण्‍यात यावेत.

स्‍थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी शिवाय मंडपाची उभारणी करण्‍यात येवू नये.

4.

4.     या वर्षाची नवरात्रौत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करणे करावा त्‍याअनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्‍सव देवीची मुर्तीची सजावट त्‍या अनुषंगाने करण्‍यात यावी.

सार्वजनिक देवीचीची सजावट करतांना त्‍यात भपकेबाजी नसावी.

5.

5.   देवीची मूर्ती उंची सार्वजनिक मंडळांकरिता 04 फूट व घरगुती देवीच्‍या मुर्तींची उंची 02 फूटांच्‍या मर्यादेत असे अणिवार्य.

जास्‍त मोठया/उंच देवीची मुर्तीची स्‍थापना करु नये.

 

6.

6.    यावर्षी शक्‍यतो पारंपारिक देवीच्‍या मुर्तीऐवजी घरातील धातू /संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरण पूरक असल्‍यास तिचे विसर्जन शक्‍यतो घरच्‍या घरी करावे.

शक्‍यतो POP ची देवीची मुर्ती वापरू नये. 

7.

7.   विसर्जन घरी करणे शक्‍य नसल्‍यास स्‍थानिक प्रशासनाच्‍या कृत्रिम तलावात विसर्जन करावे.

8.    देवीच्‍या आगमन व विसर्जनप्रसंगी मिरवणुका काढू नये व अनावश्‍यक ध्‍वनी प्रदुषण करु नये.

8.

9.      उत्‍सवाकरिता वर्गणी/देणगी स्‍वेच्‍छेने दिल्‍यास त्‍यांचा स्‍वीकार करावा.

10. सार्वजनिक  मंडळांनी वर्गणीबाबत आग्रह धरु नये.

9.

11.   आरोग्‍य विषयक व सामाजिक संदेश असलेल्‍या जाहिराती प्रदर्शित करण्‍यास पसंती देण्‍यात यावी. तसेच शासनाची माझे कुटुंब माझी जबाबदारीया मोहिमेबाबत देखील जनजागृती करावी.

12.  जाहिरातीच्‍या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही  असे पहावे.

10.

13. सांस्‍कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्‍य विषयक उपक्रम/शिबीरे उदा. रक्‍तदान आयोजित करण्‍यास प्राधान्‍य दयावे,  सार्वजनिक व सामाजिक संदेश असलेल्‍या जाहीराती प्रदर्शित कराव्‍यात. त्‍याव्‍दारे कोरोना, मलेरिया, डेंगू इ. आजार आणि त्‍यांचे प्रतिबंधात्‍मक उपाय तसेच स्‍वच्‍छता यांबाबत जनजागृती करण्‍यात यावी

गरबा, दांडिया व इतर सांस्‍कृतीक कार्यक्रम आयोजित करू नये.

11.

14. आरती, भजन, किर्तन वा अन्‍य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना ध्‍वनी प्रदुषाणासंदर्भातील नियमांची व तरतुदीचे पालन करावे.

आरती, भजन, किर्तन वा अन्‍य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना 5 पेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती एकत्र येऊ नये.

12.

15. देवीच्‍या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्‍यादीव्‍दारे उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत जास्‍तीत जास्‍त व्‍यवस्‍था करावी.

सार्वजनिक नवरात्रौत्‍सव मंडळाच्‍या मंडपामध्‍ये 5 पेक्षा जास्‍त कार्यकर्त्‍याची उपस्थिती नसावी.

13.

16. सार्वजनिक नवरात्रौत्‍सव मंडळाच्‍या ठिकाणी शारिरीक अंतराचे (दो गज की दुरी) पालन करावे व मास्‍क आणि सॅनिटायजरचा वापरा करावा.

सार्वजनिक नवरात्रौत्‍सव मंडळांनी महाप्रसाद, भंडारा अथवा पेय पाणी इत्‍यादींचे आयोजन करु नये.

14.

17. नवरात्रौत्‍सव मंडपामध्‍ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्‍क्रीनिंगची पर्याप्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. प्रत्‍यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्‍टन्‍सींग) तसेच स्‍वच्‍छतेचे नियम (मास्‍क, सॅनीटायझर इ.) पाळण्‍यात यावे.

शारिरीक अंतराचे व स्‍वच्‍छतेचे नियम मोडू नये.

15.

18.  देवीचे आगमन व विसर्जन स्‍थळी होणारी आरती घरीच करावी.

 

19. देवीच्‍या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्‍यात येऊ नयेत. विसर्जनाच्‍या पारंपारिक पध्‍दतीत विसर्जन स्‍थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्‍थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्‍ठ नागरिकांनी सुरक्षेच्‍या दृष्‍टीने विसर्जनस्‍थळी जाणे टाळावे.

16.

20.  स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांनी घरगुती व सार्वजनिक मंडळाच्‍या मुर्ती संकलित करण्‍यासाठी मोठया वाहनाची व्‍यवस्‍था करावी. सर्व नागरीकांनी आपल्‍या देवीच्‍या मुर्ती सदरील वाहनामध्‍ये सुपूर्द कराव्‍यात.

संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती देवीच्‍या मुर्तींच्‍या विसर्जनाची मिरवणूक एकत्रीतरित्‍या काढण्‍यात येऊ नयेत.

 

17.

महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्‍था, लोक प्रतिनिधी, स्‍वंयसेवी संस्‍था इत्‍यादींच्‍या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्‍यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्‍यासाठी स्‍थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्विकृती केंद्राची व्‍यवस्‍था करावी.

21.  विसर्जनाच्‍या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्‍सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर, मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्‍यात येवू नये.

18.

22. संबंधित स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांनी संकलित झालेल्‍या देवींच्‍या मुर्तीचे पावित्र्य व मांगल्‍य राखून विधीपुर्वक कृत्रिम तलावात विसर्जित कराव्‍यात. याबाबत जास्‍तीत जास्‍त प्रसिध्‍दी देण्‍यात यावी.

23. सार्वजनिक तलाव, विहीरी, धरण, नदी इत्‍यादी ठिकाणी देवीच्‍या मुर्तीचे विसर्जन करण्‍यासाठी जावू नये.

 

19.

24.दस-याच्‍या दिवशी करण्‍यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्‍मक स्‍वरुपाचा असावा. रावण दहनाकरिता आवश्‍यक तेवढया किमान व्‍यक्‍तीच कार्यक्रम स्‍थळी हजर रहावे. कार्यक्रम समाजमाध्‍यमातून थेट प्रक्षेपित करण्‍याची सोय करावी.

25. दस-याच्‍या दिवशी करण्‍यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रमास  प्रेक्षक बोलावू नये.

 

20.

सार्वजनिक मंडळ स्‍थापन करण्‍याऐवजी त्‍या खर्चात सामाजिक कार्य जसे की, सॅनिटायजरचे वाटप करावे तसेच कोरोना योध्‍दांचा गौरव करण्‍यात यावा.

शारिरीक अंतर (फिजीकल डिस्‍टन्‍सींग) चा भंग करण्‍यात येवू  नये. 

 

        कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुर्नवसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, शासनाच्‍या संदर्भिय आदेशांचे, जिल्हाधिकारी  कार्यालयाने निर्गमित केलेल्‍या आदेशाचे, संबंधित महापालिका, पोलीस, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच यानंतर प्रत्‍यक्ष उत्‍सव सुरु होण्‍याच्‍या मधल्‍या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्‍द झाल्‍यास त्‍यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील, असेही श्री. चव्हाण यांनी आदेशात नमूद केले आहे.