बंद

नगर रचना कार्यालयाचे जुने, निकामी जडसंग्रह वस्तूबाबत आवाहन

प्रकाशन दिनांक : 19/08/2020

औरंगाबाद दि. 19 जिमाका – सहसंचालक, नगर रचना मूल्य निर्धारण, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद, एम.बी.सी.टॉवर, दुसरा मजला, बाबा पेट्रोल पंप जवळ, अदालत रोड, औरंगाबाद (फोन नं. 0240-2334354) या कार्यालयातील जुने व निकामी झालेल्या जडसंग्रह वस्तू (फर्निचर) लिलावाने विक्री करावयाची असल्याने ज्या संस्थेत, व्यक्तीस साहित्य खरेदी करावयाचे असल्यास त्यांनी 17.8.2020 ते 26.8.2020 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी 3 ते 5 या वेळेत पाहता येईल. तसेच लिलावाने विक्रीचा तपशील व अटी व शर्ती कार्यालयाचे सूचना फलकावर लावण्यात आले आहेत. ज्यांना अटी व शर्ती मंजूर असल्यास त्यांना वस्तू खरेदी करावयाचे असल्यास त्यांनी त्यांचे दर बंद लिफाफ्यात 27.8.2020 पर्यंत सादर करावेत. दर बंद लिफाफे 28.8.2020 रोजी उघडण्यात येतील, असे नगर रचना कार्यालयाचे सहसंचालक मोहम्मद मुदस्सीर यांनी कळविले आहे.