बंद

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय प्रशिक्षण

प्रकाशन दिनांक : 22/08/2020

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :-महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई ची शासन मान्यता असून दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

एमएस सीआयटी चा संगणक प्रशिक्षणासाठी हे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील एफआयसीसीआय अवार्ड 1999 हा प्राप्त झालेला आहे. सन 2020-21 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे असुन सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस. ऑफिस (संगणक कोर्स), मोटार अँड आमेंचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रीक कोर्स), एम.एस.सी.आय.टी (संगणक कोर्स) इत्यादी कोर्स उपलब्ध असून वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष आहे. प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा आहे तरी येथे प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कीग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारसाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना उपलब्ध आहे.

अर्ज सादर करण्याकरिता प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, ता. मिरज, जि. सांगली पिनकोड 416410, नंबर 0233-2222908 मोबाईल 7972007456, 9922577561, 9975375557 या पत्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे समक्ष अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल. तरी माफक जागा असल्याने अरजू दिव्यांगाना या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत संपर्क साधा, असे शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्राच्या अधिक्षकांनी पत्रकान्वये कळविले आहे.