बंद

दसऱ्यानिमित्त सार्वजनिक सुटीच्या दिवशी परिवहन कार्यालय सूरु

प्रकाशन दिनांक : 23/10/2020

औरंगाबाद, दि. 23(जिमाका) : दसऱ्याच्या मुहुर्तावर नवीन वाहनाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. अशा वाहनांना नोंदणी करुन जनतेला वाहनाचा ताबा मिळावा व शासकीय महसूल  जमा व्हावा यासाठी  24 व 25 ऑक्टोबर  या सार्वजनिक सुटीच्या दिवशी परिवहन व परिवहनेतर विभागातील नवीन वाहन नोंदणी कामकाज प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरु राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.