टपाल विभागातर्फे राखी वितरणासाठी व्यवस्था
प्रकाशन दिनांक : 01/08/2020
औरंगाबाद, दि.31 (जिमाका) :- लॉकडाऊनच्या काळात पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्रधान्य दिले आहे. स्पीड पोस्ट द्वारे राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवणात आनंद निर्माण होईल.या दृष्टीने राखीचा सण येत्या 3 ऑगस्ट 2020 (सोमवार) असल्यामुळे महाराष्ट्र पोस्टल सर्कलने 2 ऑगस्ट, रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष व्यवस्था केली असल्याचे वरिष्ठ पोस्ट अधीक्षक यांनी कळविले आहे.
प्राधान्यक्रमाने व वेळेत राखी टपालचे वितरण करण्यासाठी लोक स्पीड पोस्ट सेवा वापरू शकतात.
रक्षा बंधन हा सण भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा उत्सव आहे. दरवर्षी राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. या वर्षी देखील राखी राज्य पोस्टल सर्कलमधील पोस्ट ऑफिसवर बुक करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
राखी टपालाची प्रधान्यक्रमानुसार बुकिंग प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रतील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आले आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई येथेही सुरू करण्यात आले आहेत.