बंद

जीवनात खचून न जाता नव्या उर्जेने उभे राहा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 07/10/2021

‘उभारी 2.0’ उपक्रमात साहित्य वाटप

औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाचा महत्वकांक्षी उपक्रम म्हणून जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना सर्व प्रकाराची मदत ‘उभारी 2.0’ या प्रकल्पातुन केली जात आहे. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील महिला व मुलांनी खचून न जाता पुन्हा नव्या उर्जेने उभे राहण्याचे बळ देण्याचे काम जिल्हा प्रशासन करीत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. खुलताबाद येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना बळ देण्याच्या संकल्पातून गॅस कनेक्शन, पीठाची गिरणी, शिलाई मशीन तसेच सायकलचे वाटप करण्यात आले या प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.

या प्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक (ग्रामीण) निमित गोयल, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसिलदार सुरेंद्र देशमुख, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष झांबड, भ्रदा मारोती संस्थानाचे मिठूं बारगळ यांनी उपस्थिती होती.

सुनील चव्हाण म्हणाले, की नापिकी कर्जबाजारपणा व्यसनाधिनता यामुळे नैराश्यात काही शेतकरी बांधव शेवटच पाऊल उचलतात हे घडू नये यासाठी कुटुंबाने देखील प्रयत्न करावा. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या घरातील व्यक्तीने आत्महत्या केली आहे त्यांना योग्य व आवश्यक ती मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध योजनांचा एकत्रित लाभ मिळवून देत आहे.यासाठी पालक अधिकारी नेमले आहेत. यांच्याकडे त्या त्या कुटुंबानी रोजगार उपलब्धतेसाठी असणाऱ्या गोष्टी ची मागणी किंवा नोंदणी करावी जेणेकरुन योग्य लाभ लाभार्थ्यांना मिळेल. यामध्ये महिलांना व्यावसायिक पातळीवरंचे शिलाई मशिन, पीठाची गिरणी तसेच धूरमुक्त स्वयंपाक घरासाठी गॅसची जोडणी देण्यात येत आहे. यात विविध सामाजिक संस्थेने पुढाकार होऊन समाजाने देखील मदत करावी. महिला मुलांना सर्वांनी उभे राहण्याचं बळ आणि उर्जा आत्महत्याग्रस्त कुटुंबियाचा जगण्याचा मार्गातील अडसर दूर करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी केले.

‘उभारी 2.0’ या प्रकल्पांर्गत खुलताबाद तालुक्यातील 22 गावातील 42 कुटुंबियाना मदत करण्यात आली. यात खुलताबाद तहसील कार्यालयाने 25 सदस्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ सुरु करुन दिला तसेच 26 सायकली व 6 शिलाई मशीन तयेच 102 सदस्यांचा 5 लाख रुपयाचा विमा मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेमार्फत काढण्यात आला यावेळी विमा प्रमाणपत्रचे वाटप देखील करण्यात आले. रास्त भाव दुकानदार संघटना खुलताबादने 8 कुटुंबाना गॅस जोडणी व भद्रा मारोती संस्थान ने 3 व्यावसायिक पीठाच्या गिरणीचे वाटप यावेळी करण्यात आले.