बंद

जिल्ह्यात 43346 कोरोनामुक्त, 596 रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाशन दिनांक : 24/12/2020

औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) औरंगाबाद जिल्ह्यात आज 78 जणांना (मनपा 65, ग्रामीण 13) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 43346 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 70 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45134 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1192 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 596 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे

 

मनपा (57)

मयूर पार्क (1), विजय नगर चौक (1), एन – 1 सिडको (1),  योगायोग सोसायटी एन-2 सिडको (1), एन -9 परिसर(1),एन 7, सिडको (1), गांधी नगर(1), न्यू शांतिनिकेतन कॉलनी(1), नंदनवन कॉलनी (1), उदय नगर (1), समर्थनगर(1), शिवाजी नगर(1), गुलमोहर कॉलनी, एन-5 सिडको(1), ठाकरे नगर(1), गारखेडा परिसर(1), रायगड नगर (2), नॅशनल कॉलनी (1),  शिवेश्वर कॉलनी, हर्सूल(1), भावसिंगपुरा(1),  एचआरएम हौसिंग परिसर(1),  एमजीएम एन सहा (1), गजानन नगर (1), सुखसमृद्धी नगर (3), बीड बायपास (2), अन्य (29)

 

ग्रामीण (13)

छत्रपती शिवाजी नगर, सिल्लोड (1), अनय्‍  (12),

 

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.