जिल्ह्यात 4225 रुग्णांवर उपचार सुरू, 29 रुग्णांची वाढ
प्रकाशन दिनांक : 20/08/2020
औरंगाबाद, दि.20 (जिमाका) : जिल्ह्यातील 29 रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 19527 एवढी झाली आहे. त्यापैकी 14689 रुग्ण बरे झाले तर 613 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4225 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)
मनपा (23)
बारी कॉलनी (1), जवाहर कॉलनी (1), भावसिंगपुरा (1), शहानूरमियाँ दर्गा परिसर (1), मुकुंदवाडी (1), अन्य (6), शिवाजी नगर (1), एन सात सिडको (1), एन आठ सिडको (6), सुदर्शन नगर (3), एन चार सिडको (1)
ग्रामीण (06)
भवन, सिल्लोड (1), चिंचपूर, सिल्लोड (1), धामणगाव, खुलताबाद (1), रांजणगाव, शेणपूजी (1), गाढेजळगाव (1), रांजणगाव, वाळूज (1)
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत कादरी नगर, वैजापूर येथील 80 वर्षीय स्त्री, शहरातील मुकुंदवाडीतील 68 वर्षीय पुरूष, गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील 70 वर्षीय पुरूष, शहरातील शहागंज परिसरातील 52 वर्षीय स्त्री आणि आंबेडकर नगरातील 45 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.