बंद

जिल्ह्यात 4162 कोरोनामुक्त, 3172 रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाशन दिनांक : 10/07/2020

औरंगाबाद, दि. 09 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 129 जणांना (मनपा 85, ग्रामीण 44) सुटी देण्यात आली असून आजपर्यंत 4162 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 334 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 204, ग्रामीण 130) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7672 एवढी झाली आहे. आजपर्यंत 338 जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण 3172 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळनंतर 26 रुग्णांची (11 पुरूष, 15 महिला) वाढ झाली आहे.
*मनपा हद्दीतील रुग्ण : (15)*
पद्मपुरा (13), बीड बायपास (2)
*ग्रामीण रुग्ण : (11)*
गंगापूर (1), रांजणगाव, गंगापूर (7), बोरगाव फुलंब्री (2), एनएमसी कॉलनी, वैजापूर (1)
*तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीमध्ये गंगापुरातील 52 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात पडेगावातील आमले गल्लीतील 48 वर्षीय पुरूष, कैलास नगरात संत एकनाथ सोसायटीतील 59 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.