बंद

जिल्ह्यात 39113 कोरोनामुक्त, 719 रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाशन दिनांक : 07/11/2020

औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 73 जणांना (मनपा 33, ग्रामीण 40) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 39113 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 86 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40933 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1101 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 719 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (54)
गाडीवाट (1), बेगमपुरा (1), छावणी, दानाबाजार (1), मंदार अपार्टमेंट, उल्कानगरी (2), धनगर गल्ली (1),खिंवसरा पार्क (1),भावसिंगपुरा पेठे नगर (1), एन-2 सिडको (1), बीएसएनएल सिटी कॉम्पलेक्स परिसर (1), शिवाजी नगर (1), रिलायन्स मॉल परिसर (1), काजीवाडा (1), विशालनगर (1), इंदिरा नगर (1), एसबीआय बँक परिसर सिडको (2), सिडको (1), लाम्बा बिल्डींग, पदमपुरा (1), कामगार चौक, केतकी हॉस्पिटल परिसर (2), संजय नगर (1), एन सहा सिडको (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1), अन्य (30)

ग्रामीण (32)
मंमनापुर (1), शिक्षक कॉलनी, रांजणगाव (2),मोढा खुर्द, सिल्लोड (3), वरचापाढा, शिऊर (1),बोकरगाव मनूर, वैजापूर (3), घायगाव (1), औरंगाबाद (1), फुलंब्री (5), गंगापूर (1), वैजापूर (1), पैठण (1),बाजार सावंगी (1), ग्लोबल सिटी कमलापूर (1), तनवानी स्कुल, बजाजनगर (2), सिम्स सोसायटी बजाजनगर (1), म्हाडा कॉलनी (1), आपेगाव, गंगापूर(1), अन्य (5)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत राम नगर, मुकुंदवाडीमधील 65 वर्षीय स्त्री आणि हर्सुलमधील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.