बंद

जिल्ह्यात 3346 रुग्णांवर उपचार सुरु, तीन रुग्णांची वाढ

प्रकाशन दिनांक : 05/08/2020

औरंगाबाद,दि.5 (जिमाका) – जिल्ह्यातील तीन रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15211 एवढी झाली आहे. त्यापैकी 11368 बरे झाले तर 497 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3346 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा  प्रशासनाने कळविले आहे.

मनपा  (2)

क्रांती नगर (1), शांतीपुरा छावणी (1)

ग्रामीण (1)

निल्लोड, सिल्लोड (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत फुलंब्रीच्या वडोद बाजार  येथील 53 वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील जामा मस्जिद परिसरातील 61 वर्षीय स्त्री, शहरातील छावणी येथील 67 वर्षीय पुरुष, एन सहा संभाजी कॉलनीतील 50 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.