बंद

जिल्ह्यात 26359 कोरोनामुक्त, 5890 रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाशन दिनांक : 29/09/2020

औरंगाबाद, दिनांक 28 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 243 जणांना (मनपा 144, ग्रामीण 99) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 26359 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 181 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33174 झाली आहे. आजपर्यंत एकूण 925 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5890 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 90 आणि ग्रामीण भागात 58 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (71)

सिल्लोड  (1), म्हस्के वस्त्री, सवंडगाव  (3), पाचोड, पैठण  (2), अन्य  (1), नाटकरवाडी  (1), गिरनेर तांडा  (1), रामनगर  (4),

औरंगाबाद (22), फुलंब्री (3), गंगापूर (9), कन्नड (6), खुलताबाद (4), सिल्लोड (2), वैजापूर (4), पैठण (2), सोयगाव (6)

मनपा (20)

पद्मपुरा (2), कोकणवाडी  (2), नाथ प्रांगण, शिवाजी नगर  (1), एन दहा सिडको  (2), पुंडलिक नगर  (1), रेणूका नगर  (1), आयप्पा मंदिर परिसर, बीड बाय पास  (1), नवीन म्हाडा कॉलनी  (1),चाणक्यपुरी  (2), मिलिट्री हॉस्पीटल परिसर  (1), लेबर कॉलनी  (1), आदित्य सो, (1),सुदर्शन नगर एन अकरा  (1), गार्गी रेसीडन्सी, उस्मानपुरा  (1),बजाजनगर  (1), सत्यम नगर (1),

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत सईदा कॉलनीतील 58 वर्षीय स्त्री, हस्ता कन्नड येथील 60 वर्षीय पुरूष, वैजापुरातील 65 वर्षीय स्त्री, अडगाव निपाणी येथील 68 वर्षीय पुरूष, देऊळगाव बाजार, सिल्लोड येथील 65 वर्षीय पुरूष, एन आठ सिडको येथील 83 वर्षीय स्त्री, कन्नडच्या बुद्ध नगरातील 52 वर्षीय पुरूष आणि  खासगी रुग्णालयात उस्मानपुऱ्यातील 64 पुरूष, मनजित नगरातील 69 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला.