बंद

जिल्ह्यात 15712 कोरोनामुक्त, 4381 रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाशन दिनांक : 24/08/2020

औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 349 जणांना (मनपा 151, ग्रामीण 198) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 15712 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 288 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20727 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 634 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4381 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळनंतर 131 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 61, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 42 आणि ग्रामीण भागात 23 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

ग्रामीण (24)

गोदावरी कॉलनी, पैठण (1), औरंगाबाद (9), गंगापूर (7), कन्नड (2), पैठण (3), सोयगाव (2)

मनपा (4)

पद्मपुरा (1), मिल कॉर्नर (1), अभिनय सो., माया नगर (1), प्रभू नगर (1),

सिटी एंट्री पॉइंट (61)

 सिडको (2), बसैये नगर (1),  राधास्वामी कॉलनी (2), पोलिस क्वार्टर (1), ज्योती नगर (1), हायकोर्ट कॉलनी, बीड बायपास (1), हनुमान नगर (1), एल अँड टी कंपनी गेस्ट हाऊस, नक्षत्र वाडी (1), म्हाडा कॉलनी (8), चौधरी कॉलनी (3), वरझडी, झाल्टा (2), चिकलठाणा (3), करोडी (2), रांजणगाव (1), पडेगाव (1), बीड बायपास (2), वडगाव कोल्हाटी (2),भावसिंगपुरा (3), बजाजनगर (5), तांडा बुद्रुक,पैठण (1), इटखेडा (1), लाखेगाव (2), देवळाई परिसर (1), सारा परिवर्तन, जटवाडा (2),  किनगाव (1), टीव्ही सेंटर (1), पहाडसिंगपुरा (1), बेगमपुरा (1), अंबर हिल, जटवाडा (1), मयूर पार्क (1), पुंडलिक नगर (3), हर्सूल (1), एन पाच,सिडको (1), एन आठ सिडको (1)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत बारी कॉलनी, कटकट गेट येथील 63 पुरूष, भीमनगर, भावसिंगपुरा येथील 62 वर्षीय स्त्री, पडेगाव, फुले नगरातील 55 वर्षीय पुरूष, सोयगाव तालुक्यातील खामखेडा 65 वर्षीय पुरूष आणि फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.