बंद

जिल्ह्यात 15152 कोरोनामुक्त, 4270 रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाशन दिनांक : 22/08/2020

औरंगाबाद, दिनांक 21 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 225 जणांना (मनपा 138, ग्रामीण 87) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 15152 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 310 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20044 झाली आहे. आजपर्यंत एकूण 622 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4270 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळनंतर 193 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 46, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 77 आणि ग्रामीण भागात 51 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

ग्रामीण (61)

औरंगाबाद (4), फुलंब्री (2), गंगापूर (27), कन्नड (11), वैजापूर (1), पैठण (1), सोयगाव (5)

म्हसोबा गल्ली, सिल्लोड (1), बाजारपेठ सिल्लोड (5), निल्लोड, सिल्लोड (3), टिळक नगर, सिल्लोड (1),

मनपा (09)

एनआरएच हॉस्टेल परिसर (1), अंबिका नगर, मुकुंदवाडी (1), राम नगर (1), पवन नगर (1), टीव्ही सेंटर (1), पुंडलिक नगर, गारखेडा (3), विजय नगर (1)

सिटी एंट्री पॉइंट (46)

एन दोन सिडको (1), एन सात सिडको (3), मुकुंदवाडी (6), शेंद्रा (1), भावसिंगपुरा (1), ठाकरे नगर (1), वैजापूर (1),

पाटोदा (2), चितेगाव (1), वडगाव कोल्हाटी (1), फारोळा (1), झाल्टा (1), शेंद्रा (2), बजाजनगर (4), एकता नगर (1), नाला तांडा,सोयगाव (1), एन चार सिडको (1), पाचोरा (2), एन सहा संभाजी कॉलनी (1), एन अकरा हडको (1), राधास्वामी कॉलनी, जटवाडा (1), मयूरपार्क (1), टीव्ही सेंटर (1), कोल्हाटी फाटा (1), वाळूज एमआयडीसी (1), सिडको (1), दारदोन तांडा, देवळाई परिसर (7)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत शहरातील चिकलठाणा येथील 75 वर्षीय स्त्री, लेबर कॉलनी, हर्ष नगरातील 42 वर्षीय स्त्री, हर्सुलमधील 48 वर्षीय पुरूष, चौधरी कॉलनी, चिकलठाणा येथील 60 वर्षीय पुरूष आणि गंगापूर तालुक्यातील 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.