बंद

जिल्ह्यात 13474 कोरोनामुक्त, 4209 रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाशन दिनांक : 14/08/2020

औरंगाबाद, दि.14 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 220 जणांना (मनपा 69, ग्रामीण 151) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 13474 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 292 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18259 झाली आहे. आजपर्यंत एकूण 576 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4209 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुपारनंतर 174 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 47, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 40 आणि ग्रामीण भागात 78 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (79)

रांजणगाव (1),औरंगाबाद (9), फुलंब्री (1), गंगापूर (3), कन्नड (23), सिल्लोड (15), पैठण (27)

सिटी एंट्री पॉइंट (47)

रांजणगाव (3), देवळाई (1), पद्मपुरा (3), जाधववाडी (6), फुलंब्री (1), अन्य (3), जय महाराष्ट्र कॉलनी (4), एन आठ (2), नवनाथ नगर (4), पान दरबा (2), सावंगी (1), जवाहर कॉलनी (1), सनी सेंटर (1), पेठे नगर (1), गणेश नगर (1), झाल्टा (1), पैठण (2), राम नगर (1), नक्षत्रवाडी (2), खुलताबाद (2), मिटमिटा (1), मुकुंदवाडी (1), सातारा परिसर (1), शेंद्रा (1), जळगाव (1)

मनपा (08)

रामगोपाल नगर (1), घाटी परिसर (1), अन्य (2), मिल कॉर्नर (1), शिवशंकर कॉलनी (1), उस्मानपुरा (1), प्रकाश नगर, सिडको (1)

कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत पैठणमधील 64 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.