बंद

जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी

प्रकाशन दिनांक : 21/08/2020

औरंगाबाद, दि.20 (जिमाका) :- कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 या कालावधीत गणेशोत्सवानिमित्त जनतेने पालन करावयाच्या नियमाबाबत शासन परिपत्रक दिनांक 11 जुलै 2020 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील सर्व जनतेनी काय करावे, काय करू नये याबाबत सूचना खालील प्रमाणे आहेत.

अ.क्र. काय करावे काय करू नये
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करावे. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्लंघन करण्यात येवु नये
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी संबंधित स्थानिक प्रशासनाची ऑनलाईन परवानगी घ्यावी. गणेशोत्सव मंडळांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पुर्वपरवानगी शिवाय गणपतीची स्थापना करू नये.
गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. सार्वजनिक गणेश मंडळांनी महाप्रसाद, भंडारा इत्यादींचे आयोजन करू नये.
सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी शारिरीक अंतराचे पालन करावे व मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून नये.
श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरीता 04 फूट व घरगुती गणपती 02 फुटांच्या मर्यादेत असावी. तसेच शक्यतो घरीच धातू/संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे. जास्त मोठ्या/उंच गणेश मुर्तींची स्थापना करण्यात येवु नये, शक्यतो प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीची स्थापना करू नये. 
स्थानिक प्रशासनांकडून श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा शक्यतो ऑनलाईन करण्यात यावी. विसर्जनस्थळी अनावश्यक गर्दी करू नये.
घरगुती गणपतीचे घरातच किंवा स्थानिक प्रशासनाच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे. श्रीगणेशाच्या आगमन व विसर्जनप्रसंगी मिरवणुका काढु नये व अनावश्यक ध्वनी प्रदुषण करून नये.
विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करावी. विसर्जनस्थळी अनावश्यकरीत्या थांबुन गर्दी करून नये. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे
उत्सवाकरीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वर्गणीबाबत आग्रह धरू नये.
१० सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना साध्या पद्धतीने करावी. सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकबाजी नसावी.
११ सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे, सार्वजनिक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात. प्रतिबंधित्‍ क्षेत्रात (कंटोनमेंट झोन) श्रीगणेश मुर्तींची स्थापना करण्यात येऊ नये.
१२ कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नये.
१३ स्थानिक स्वराज्य संस्थांनी घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या मुर्ती संकलित करण्यासाठी मोठ्या वाहनाची व्यवस्था करावी. सर्व नागरिकांनी आपल्या श्रीगणेशाच्या मुर्ती सदरील वाहनामध्ये सुपुर्द कराव्यात. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रीतरित्या काढण्यात येऊ नयेत.
१४ संबंधित्‍ स्थानिक स्वराज्य संस्थांनी संकलित झालेल्या श्रीगणेशाच्या मुर्तींचे पावित्र्य व मांगल्य राखुन विधीपुर्वक कृत्रिम तलावात विसर्जित कराव्यात. सार्वजनिक तलाव, विहीरी, धरण, नदी इत्यादी ठिकाणी श्री गणेशाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी जाऊ नये.
१५ गणेश मंडळ स्थापन करण्याऐवजी त्या खर्चात सामाजिक कार्य जसे की, सॅनिटायजरचे वाटप करावे तसेच कोरोना योध्यांचा गौरव करण्यात यावा. शारीरीक अंतर (फिजीकल डिस्टन्सींग) चा भंग करण्यात येऊ नये.