बंद

जिल्ह्यातील 17 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब अनुदानास पात्र

प्रकाशन दिनांक : 29/07/2022

औरंगाबाददि. 29 (जिमाका) :  शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबत जिल्हास्तरीय  समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलीया बैठकीत एकूण 17 प्रकरणे ठेवण्यात आली होतीती सर्व पात्र ठरवण्यात आलीबैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉअनंत गव्हाणे,  निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्यजिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडेवैद्यकीय अधिकारी डॉप्रदीप कुलकर्णीपोलिसमहसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.