• साइट नकाशा
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

जिल्हा प्रशासनातर्फे नववर्षानिमित्त जनतेला सूचना

प्रकाशन दिनांक : 30/12/2020

औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका) : फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार औरंगाबाद जिल्‍हयासाठी पोलिस आयुक्‍त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्षानिमित्‍त औरंगाबाद जिल्‍ह्यातील सर्व जनतेला काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत.

अ.क्र.

काय करावे

काय करु नये

01

1.     कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे पालन करावे.

कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भावच्‍या अनुषंगाने कोणत्‍याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्‍या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्‍लंघन करण्‍यात येऊ नये.

02

2.   नववर्षाचे स्‍वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.

बागेत, रस्‍त्‍यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्‍येने गर्दी करु नये.

03

3.   नूतन वर्षाच्‍या पहील्‍या दिवशी नागरिकांनी धार्मिक स्‍थळी गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन करावे. मास्‍क आणि सॅनिटायजरचा वापर करावा.

60 वर्षावरील नागरीकांनी व 10 वर्षाखालील बालकांनी शक्‍यतो घराबाहेर जाऊ नये.

04

4.  धार्मिक स्‍थळी संबंधितांनी आरोग्‍य व स्‍वच्‍छतेच्‍या दृष्‍टीकोनातून योग्‍य त्‍या खबरदारीच्‍या उपाययोजना कराव्‍यात.

धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्‍यात येऊ नये.

05

5.    ध्‍वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करण्‍यात यावे.

6.   फटाक्‍याची आतषबाजी करण्‍यात येऊ नये.