जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात १४४ कलम
प्रकाशन दिनांक : 01/04/2019
औरंगाबाद- दि ३१ (जिमाका) – औरंगाबाद शहर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलेले आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे, गाणे म्हणणे, कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचार करण्यास, वाहनाच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटार वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटरच्या परिसरात आणण्यास, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांसह पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास प्रतिबंध घालण्यात येत असल्याचे आदेश पोलीस आयुक्तालयाच्यावतीने पोलिस उपायुक्त यांनी निर्गमित केले आहे. हा आदेश आठ एप्रिलपर्यंत लागू राहतील, असेही नमूद करण्यात आलेले आहे.
******