बंद

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

प्रकाशन दिनांक : 27/01/2021

360 कोटींचा आराखडा मंजूर

  • वाढीव निधीतून जिल्ह्यातील गरजा पूर्ण होणार
  • मानव विकास निर्देशांक वाढीसाठी प्रयत्न
  • क्रीडा विद्यापीठ स्थापन्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न
  • 160 कोटींची नवीन गुंतवणूक जिल्ह्यात होणार

औरंगाबाद, दि.25, (जिमाका) :- सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 360 कोटींचा आराखडा मंजूर केला असून औरंगाबाद शहराच्या सर्वांगिण विकासाबरोबरच आरोग्य, शिक्षण, उद्योग त्याचप्रमाणे पर्यटन आणि मानवी विकासासंदर्भात असणाऱ्या योजनांसाठी वाढीव निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार्य आणि आत्मियतेने सर्व यंत्रणांनी काम करावे असे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीदरम्यान केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक्‍ पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार,खासदार डॉ.भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाठ, आ.अतुल सावे, आ.प्रशांत बंब, आ.अंबादास दानवे, आ.रमेश बोरनारे, आ.उदयसिंग राजपूत, आ.नारायण कुचे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील, महावितरणचे संचालक नरेश गिते, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंझारे उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासंदर्भात्‍ असलेल्या योजना यामध्ये कृषी, आरोग्य त्याचप्रमाणे शिक्षण, रस्ते विकास याबाबतच्या योजनांसाठी वाढीव निधी मंजूर केला असून पालकमंत्री या नात्याने समन्वयातुन जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडु दिली जाणार नाही अशी ग्वाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री.देसाई यांनी दिली.

बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले. यानंतर महानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ‘स्मार्ट सिटीजन’ या अभियानाविषयी प्रास्ताविकात माहिती दिली. यानंतर ‘स्मार्ट सिटीजन’ या अभियानाच्या लोगोचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये शिक्षण, आरोग्य, स्त्री-पुरूष प्रमाण, उद्योग, सेवाक्षेत्र, पर्यटन या बाबींचा समावेश असलेला अहवाल सादर करण्यात आला. बैठकीदरम्यान औरंगाबाद येथील क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याबाबत त्याचप्रमाणे ग्रामीण रस्ते आणि पाणंद रस्ते, पैठण येथील संत विद्यापीठ, शहरातील अंतर्गत रस्ते, जिल्हा परिषद शाळांसाठी कुंपण, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांना मान्यता, नवीन केंद्रीय विद्यालय आणि आर्मी पब्लिक स्कुल सुरू करण्या संदर्भातील विविध मागण्यांवर नियोजन करुन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी केल्या. यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या विविध विभागप्रमुखांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनकडे प्रस्ताव सादर करावेत. या बाबींच्या पुर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. सर्वांच्या तळमळीणे आणि आत्मियतेने जिल्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. अशी ग्वाही पालकमंत्री श्री.देसाई यांनी बैठकीच्या समारोप प्रसंगी दिली. यानंतर सभागृहातच जलजीवन मिशन आराखड्याचे सादरीकरण जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री.घुगे यांनी सादर केले. आज राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्याने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्वांनी जागरुक मतदार व नागरिक म्हणून प्रतीज्ञा घेतली.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 मधील डिसेंबर,2020 अखेरच्या खर्चाचा आढावा.

 (रु.कोटीत)

वर्ष

अर्थसंकल्पित नियतव्यय

प्राप्त निधी

आजपर्यंतची प्रशासकीय मान्यता रक्कम

आजपर्यंत वितरीत निधी

प्राप्त निधीशी प्रशासकीय मान्यतेचीटक्केवारी

2020-21

325.50

325.50

88.29

57.63

27.12%

  • शासनाचे निर्देशाप्रमाणे सन 2020-21 मध्ये एकूण नियतव्ययाच्या 16.50% निधी कोविड (COVID – 19) या जिवाणू मुळे पसरणा-या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंध करण्यासाठी रु.53.71 कोटी उपलबधअसुन रु.53.68 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
  • विशेष घटक योजना (SCP) व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील उपयोजना (OTSP) – 2020-21

 (रु.कोटीत)

अ.

क्र.

विकास क्षेत्राचे नांव

सन 2020-21

मंजूर अर्थसंकल्पीय नियतव्यय

माहे डिसेंबर – 2020 अखेर झालेला खर्च

1

आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (OTSP)

7.66

0.00

2

विशेष घटक योजना (SCP)

103.24

0.00

  • जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 प्रारुप आराखडयास  मान्यता.

प्रस्तावीत आराखडा – 2021-22

अ.क्र.

योजना

रु.265.68 कोटी

मर्यादेत (रु.लाखात)

रु.360.00 कोटीच्या प्रस्तावीत वाढीवनुसार (रु.लाखात)

1

नाविण्यपूर्ण योजना (3.5%)

929.88

1260.00

2

मुल्यमापन, संनियंत्रण व डेटाएन्ट्री (0.5%)

132.84

180.00

3

शाश्वत विकास ध्येये (Sustainable Development Goals) (1.00%)

265.68

360.00

4

जिल्हा नियोजन समिती बळकटीकरण

15.26

15.26

5

तातडीच्या उपाययोजना

2.00

2.00

6

उर्वरीत निधी (गाभा व बिगर गाभा क्षेत्रासाठी)

25222.34

34182.74

 

पैकी गाभा क्षेत्रासाठी (2/3)

16814.89

22788.49

 

बिगर गाभा क्षेत्रासाठी (1/3)

8407.45

11394.25

एकूण आराखडा :

26568.00

36000.00


जिल्हावार्षिकयोजना(सर्वसाधारण)सन2021-22

ठळकबाबी

  • सन 2021-22 ची वित्तिय मर्यादा रु.265.68 कोटी
  • यंत्रणांची एकूण मागणी रु.600.06 कोटी
  • प्रस्तावीत वाढीव आराखडा रु.360.00 कोटी
  • सन 2021-22 च्या प्राप्त वित्तिय मर्यादेनुसार वाढीव मागणी रु.94.32 कोटी

जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (OTSP) प्रारुपआराखडा मान्यता

(रु.लाखात)

शिर्ष

यंत्रणांची मागणी

रु.7.66 कोटी वित्तीय मर्यादेनुसार

अतिरिक्त मागणी

1. गाभा क्षेत्र योजना

630.51

284.04

346.47

2. गाभाक्षेत्र योजना

131.01

67.12

63.89

3. मागासवर्गीयांचे कल्याण (विशेष क्षेत्र)

451.01

396.01

55.00

4. नाविन्य पुर्ण योजना

15.33

15.33

0.00

4. मुल्यमापन, संनियत्रण  व उपयोगितातपासणी

3.83

3.83

0.00

जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 विशेष घटक योजना (SCP) प्रारुप आराखडयास  मान्यता                                                                                                                                      

(रु.लाखात)

शिर्ष

यंत्रणांची

मागणी

रु.103.24 कोटी वित्तीय मर्यादेनुसार

अतिरिक्त मागणी

1. कृषी व संलग्नसेवा

1619.00

1619.00

0.00

2. ग्रामीणविकास

0.00

0.00

0.00

3. पाटबंधारे व पुरनियंत्रण

0.00

0.00

0.00

4. विदयुतविकास

2500.00

1600.00

900.00

5. उदयोग व खाणकाम

62.00

47.00

15.00

6. वाहतुक व दळणवळण

0.00

0.00

0.00

7. सर्वसाधारणआर्थिकसेवा

0.00

0.00

0.00

8. सामाजिक व सामुहिकसेवा

7439.40

6748.28

691.12

9. वैशिष्टपुर्णयोजनांसाठीराखुनठेवावयाचा 3 % निधी

309.72

309.72

0.00

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न