बंद

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली शहरातील विविध रस्त्यांची पाहणी

प्रकाशन दिनांक : 26/12/2020

औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका) :  जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त सुनील चव्हाण यांनी शहरातील विविध रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ते, पदपथ आदी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना मनपा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांच्या अधिकाऱ्यांना आज दिल्या.

या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त यांच्यासमवेत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अशोक इंगळे, महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, नगर रचना विभागाचे सहायक संचालक जयंत रवखडकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहायक अभियंता गणेश मुळीकर आदींची उपस्थिती होती.

या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी रस्त्यांची कामे दर्जेदार करताना चांगली गुणवत्ता राखायला हवी. काम पूर्ण झालेल्या रस्त्यांवर आवश्यक त्याप्रमाणात पाणी, रस्त्याची योग्य उंची, सपाटीकरण, सारखेपणा, रस्त्यांच्या बाजूचे पदपथ व्यवस्थित करणे, पार्किंग व्यवस्था करणे, रिक्षा चालकांना रिक्षा उभे करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्थ‍ित जागा, रस्त्यातील दुभाजकांचे सौंदर्यीकरण करणे, झाडांना आवश्यक कुंपन आदी करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

        शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव रोडवरील साई मेडिसिटी हॉस्पीटल जवळील गणेश कॉलनी, जाधववाडी, घृ्ष्णेश्वर कॉलनी, सिडको बसस्थानक  परिसर, एपीआय कॉर्नर, प्रोझोन मॉल ते कलाग्राम रस्ता आणि एमजीएम रुग्णालय परिसरातील रस्ते कामांच्या गुणवत्तेची तपासणी करून आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त श्री. चव्हाण यांनी केल्या.

 

Collector_sir_image