बंद

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क

प्रकाशन दिनांक : 01/12/2020

 

औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी किल्लेअर्क परिसरातील शासकीय महाविद्यालयात आज दुपारी 12 वाजता औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर श्री. चव्हाणे म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील 206 मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केलेली आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. तसेच कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भाव पाहता सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. तसेच लोकशाही बळकटीकरणासाठी जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी यावेळी पदवीधर मतदारांना केले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क