बंद

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते लसीकरण जनजागृती चित्ररथाचा शुभारंभ

प्रकाशन दिनांक : 23/11/2021

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लस, असंघटित कामगारांसाठी योजना, मतदार पुनरीक्षण कार्यक्रम आदींबाबत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार केलेल्या चित्ररथाचे उद्घाटन  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते आज फीत कापून झाले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जनजागृती चित्ररथास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींची उपस्थिती होती.

कोविड प्रतिबंधात्मक लस सुरक्षित आहे. प्रत्येकाने ती घ्यावी व इतरांनाही प्रोत्साहित करावे. शासनाच्या ‘हर घर दस्तक’ मोहिमेतून लसीकरणाचे सर्वेक्षण करून लसचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. ज्या भागामध्ये लसीकरणाला अल्प प्रतिसाद आहे त्या भागात चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चित्ररथामध्ये असंघटित कामगारांसाठी असलेल्या योजना, मतदार पुनरीक्षण कार्यक्रम, मतदारांमध्ये जागृती आदींबाबत चित्ररथ, डिजिटल पद्धतीने जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री.चिलंवत यांनी यावेळी दिली. 

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते लसीकरण जनजागृती चित्ररथाचा शुभारंभ