बंद

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केली वेरुळ व कन्नड तालूक्यातील विविध विकास कामांची पाहणी

प्रकाशन दिनांक : 22/10/2021

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : वेरुळ येथील मालोजी राजे भोसले गढी व शहाजी राजे स्मारक परिसराची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दि. 21 ऑक्टोबर रोजी पाहणी केली असून वेरुळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी एैतिहासिक स्थळ म्हणून पर्यटकांना येथे येण्याची संधी उपलबध व्हावी, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबाबत स्थनिक प्रशासनास सूचना केल्या. वेरुळ येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी स्वतंत्र पार्कींग, बसण्यासाठी बाकडे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छातागृह तसेच आवारात स्थित हॉलमध्ये विविध चित्र प्रदर्शनातून एैतिहासिक घटनाधारित सांगणारा चित्र प्रदर्शन तयार करावे, अशा सूचना यावेळी दिल्या.

यावेळी समवेत उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसिलदार सुरेंद्र देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वेरुळचे सरपंच प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती.

यानंतर जिल्हाधिकारी यांनी देभेगाव ता. कन्नड येथील न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे भेट दिली. मराठवाडा कॅडेट कोअरच्या विद्यार्थीनींनी केलेल्या पथसंचलन कार्यक्रमास उपस्थिती होती. यावेळी ग्रामीण भागातील मुली मध्ये देशसेवेची प्रेरणा जागृत करून त्या विषयीचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या शाळेच्या व्यवस्थापणाविषयी कौतुक केले. तसेच मुलींच्या शिस्तबद्ध जीवनाकडे वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच जीवनात यशस्वी होण्यासाठी ‘वाचन’ हे खूप महत्वाचे असून वाचाल तर जीवनात विविध संकटातून वाचाल असे सांगून निग्रहीपणे जीवनात उभे रहा, यासाठी परिश्रम आवश्यक असून यशस्वी जीवानासाठी शुभेच्छा दिल्या .यावेळी देभेगावचे रहिवासी तसेच जागतिक किर्तीचे ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ.विजय सुरासे यांची सहकुंटूब उपस्थिती होती.

देवळाणा ग्रामपंचायत कार्यालयास भेट देवून ग्रामीण भागातील रस्ते व इतर पायाभूत सुविधा विषयी जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. या गावामध्ये डॉ. विजय सुरासे यांच्या मदतीमधून गावात स्वच्छ पाणी उपलब्धतेसाठी आरओ प्लॅन्टची पाहणी यावेळी केली. तसेच देभेगावच्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले. याच दौऱ्यादरम्यान देवगाव रंगारी येथील पोलीस स्टेशनला भेट देवून कायदा व सुव्यवस्था याविषयीचा आढावाही त्यांनी घेतला. यावेळी पोलीस निरिक्षक तात्याराव भालेराव तसेच सहायक पोलीस निरिक्षक डी.बी. खांडकुळे यांच्या समवेत चर्चा केली.

वैजापूर या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी यांनी दहेगाव येथील रस्त्याच्या कामाची पाहणी केली तसेच स्थानिक शेतकऱ्यासोबत संवाद साधून रस्त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला जाईल असे भेटी दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केली वेरुळ व कन्नड तालूक्यातील विविध विकास कामांची पाहणी