जिल्हाधिकारी यांनी केली शहाजी राजे यांच्या गढी-स्मारकाची पाहणी
प्रकाशन दिनांक : 04/11/2020
औरंगाबाद, दिनांक 03 (जिमाका) :- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज शहाजीराजे यांच्या वेरूळ येथील गढीची आणि स्मारक स्थळाची पाहणी केली. यावेळी समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार निखिल धुळधर, गट विकास अधिकारी श्री.सुरडकर, पुरातत्व विभागाचे समन्वयक कामाजी डक, पुरातत्व उपआवेष्क बालाजी बनसोडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते
शहाजी राजे यांच्या गढीचे जतन आणि स्मारकाची पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागाला सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. यावेळी पर्यटन स्थळाचा विकास करून लवकरात लवकर जनतेला इतिहासाचा ठेवा पाहण्यासाठी खुला करून द्यावा यासाठी वीज,पाणी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून दिल्यास जास्तीत जास्त पर्यटक या गढी आणि स्मारकास भेट देतील यासाठी परिपूर्ण पर्यटन आराखडा तयार करण्याबाबतचे निवेदन वेरुळ ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले.
