जिल्हाधिकारी यांनी केली वेरुळ, घृष्णेश्वर लेणी परिसराची पाहणी
प्रकाशन दिनांक : 07/10/2021
औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : कोविडच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच कालावधी पासून बंद असलेल्या पर्यटन स्थळ वेरुळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर तसेच वन विभागाचे उद्यान या ठिकाणी पाहणी करुन वन विभाग तसेच, पुरात्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना लेणीचे संवर्धन व पर्यटकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केल्या, यामध्ये बस वाहतुक, स्वच्छता, जेवण इतर अनुषांगिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या, यावेळी समवेत उवविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसिलदार सुरेंद्र देशमुख, पुरात्त्व विभागाचे राजेश वाकळेकर संरक्षण सहायक पुरात्त्व सर्वेक्षण, वनविभागाचे वनपिरक्षेत्र अधिकारी पेहरेकर यांची उपस्थित होती.