बंद

जिल्हाधिकारी यांनी केली शासकीय अध्यापक महाविद्यालय, विभागीय क्रीडा संकुलाची पहाणी

प्रकाशन दिनांक : 05/05/2021

औरंगाबाद, दि.05, (जिमाका):- शासकीय अध्यापक महाविद्यालय यांचे वापरात नसलेले सभागृह, तसेच विभागीय क्रीडा संकुल येथील इमारतीतील काही भाग एन.सी.सी. (नॅशनल कॅडेट कोर) च्या कार्यालयासाठी हस्तांतरीत करण्याकरीता प्रस्तावित केले असून यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शासकीय अध्यापक महाविद्यालय, प्रौढ निरंतर ची इमारत, विभागीय क्रीडा संकुल येथील आज पहाणी केली.

यावेळी ब्रिगेडियर एम.एम. विटेकर, लेफ्टनंट कर्नल अभिजित बर्वे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसिलदार रतनसिंग साळोक, क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या संजिवनी मुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक येरेकर, शाखा अभियंता प्रिती मोरे यांची उपस्थिती होती.

यावेळी श्री. चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रौढ निरंतर शिक्षण संस्थेची इमारत आणि विभागीय क्रिडा संकुल येथील उपलब्ध असणारी जागा, बांधकामाची स्थिती, कामाचा नकाशा आदीसंदर्भात सविस्तर माहिती घेतली.

शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या परीसरात एन.सी.सी.चे समुह मुख्य  कार्यालय (ग्रुप एच.क्यू.) होणार असून, प्रौढ निरंतर शिक्षण संस्थेच्या इमारतीत 50 व 51 बटालियन तर विभागीय क्रीडा संकुल येथे 7-गर्ल्स कार्यालयासाठी सदरील जागा हस्तांतरीत करण्यासंबंधी प्रस्तावित केले असून हा प्रस्ताव लवकरात लवकर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात यावा, असे यावेळी श्री. चव्हाण यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्देशीत केले.

जिल्हाधिकारी यांनी केली शासकीय अध्यापक महाविद्यालय, विभागीय क्रीडा संकुलाची पहाणी