बंद

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते माजी सैनिकांना स्वयंरोजगारांतर्गत आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप

प्रकाशन दिनांक : 16/03/2021

औरंगाबाद, दिनांक 15 (जिमाका): दरवर्षी शासनातर्फे जिल्ह्यास सशस्त्र सेना ध्वजनिधी निधी संकलनाकरीता दिलेल्या इष्टांकानुसारचा निधी जिल्हाधिकारी यांच्या सुचनेप्रमाणे जिल्ह्यातील विविध कार्यालयांकडून एकत्रित केला जातो. सदरचा निधी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचेकडे वर्ग करण्यात येतो. माजी सैनिकांच्या कल्याणार्थ हा निधी वापरला जातो. तसेच महाराष्ट्र शासनामार्फत माजी सैनिकांना स्वयंरोजगारांतर्गत आर्थिक मदत दिली जाते. सदरच्या योजनेअंतर्गत दिनांक 15 मार्च 2021 रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील 03 माजी सैनिकांना एकुण नऊ लाख रूपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.

यामध्ये प्रवासी वाहतूक करण्यासाठी बोलेरो खरेदीकरीता श्री. कडुबा पाचारणे, श्री. सय्यद लाल, श्री. गादीवाले अन्वरशाह यांना प्रत्येकी 3,00,000/- (तीन लाख) असे एकुन नऊ लाख रूपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, औरंगाबाद यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते माजी सैनिकांना स्वयंरोजगारांतर्गत आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप