जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘स्वच्छता मोहीम’
प्रकाशन दिनांक : 06/03/2021
औरंगाबाद, दि.05, (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्या नेतृत्वात ‘स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली. डॉ. गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहीमेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील झाडे-झुडपे, कचरा साफ करण्यात आला. कार्यालयाच्या दोन्ही बाजुला असणारा कचरा, प्लास्टीक गोळा करण्यात आला. या स्वच्छता मोहीमेत निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, आप्पासाहेब शिंदे, सहायक पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर, नायब तहसिलदार सिद्धार्थ धनजकर, श्री. नाईक तसेच इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
