जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
प्रकाशन दिनांक : 27/01/2021
औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, संगिता सानप, संगिता चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
